sandeep Shirguppe
मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि सी यांसारखे पोषक घटक असतात.
मेथीचे पाणी नियमीत पिल्यास पचनसंस्था निरोगी ठेवण्यास आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.
एवढेच नाही तर रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मेथीचे पाणी प्यायल्याने पचनाशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.
मेथीचे पाणी त्वचेला अनेक फायदे देते. मेथीचे पाणी स्किन एलर्जी कमी करून त्वचेचे पोषण करते.
मेथीच्या दाण्यांमध्ये म्युसिलेज नावाचा घटक असतो. यामुळे सर्दी-खोकला मध्ये आराम मिळतो.
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असल्याने भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
१ चमचा मेथीचे दाणे १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर हे पाणी गाळून रिकाम्या पोटी सेवन करा.