Anuradha Vipat
आयुर्वेदात सकाळी रिकाम्या पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.
तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात.
जेव्हा आपण रात्रभर तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून ठेवतो, तेव्हा तांब्याचे औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात, जे आरोग्यासाठी संजीवनी ठरतात.
तांब्याचे पाणी नियमित प्यायल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास मुळापासून नष्ट होतो.
जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल, तर तांब्याचे पाणी शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने विरघळवण्यास मदत करते.
तांबे शरीरात 'मेलानिन'च्या निर्मितीला चालना देते, जे त्वचेचा रंग आणि केसांच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे.
तांब्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ते पाण्यात वाढणारे हानिकारक जीवाणू नष्ट करते. हे पाणी शरीराला संसर्गापासून वाचवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.