Mahesh Gaikwad
उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकांना पचनाच्या संबंधित समस्या उद्भवू लागतात.
पोटात आग पडण्याचे मुख्य कारण म्हणजे डिहायड्रेशन, बाहेरचे जेवण आहे.
अशावेळी पोटातील जळजळ किंवा आग यापासून आराम मिळण्यासाठी या पाच भाज्या खावू शकता.
भोपळा खायला स्वादिष्ट तर आहेच पण पचनक्रिया सुधारण्यासाठही खूप फायदेशीर आहे.
कारलं चवीला कडू असते म्हणून बरेच जणांची नावडती भाजी आहे. पण कारल्यामुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे कारले खाणे बेस्ट आहे.
पचनक्रिया सुधारण्यासाठी पालकाची भाजी मदत करते. याशिवाय पोट साफ होण्यासही मदत होते.
टोमॅटोचा वापर जवळजवळ सर्वच भाज्यांमध्ये केला जातो. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी टोमॅटो खाणे फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात काकडी खाणे खूप फायदेशीर आहे. यातील तंतुमय पदार्थांमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.