Anuradha Vipat
उन्हाळ्यामुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा घालवण्यासाठी खजूर हा नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोजचा उत्तम स्रोत आहे.
खजुरामध्ये भरपूर फायबर असते, जे उन्हाळ्यात होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते.
यात पोटॅशियम भरपूर असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते.
लोहाचे प्रमाण अधिक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते आणि ॲनिमियाचा त्रास कमी होतो.
खजुरातील मॅंगनीज, सेलेनियम आणि कॉपरमुळे हाडे मजबूत होतात.
रात्री ५-६ खजूर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी ते खा. यामुळे त्याची उष्णता कमी होते.
उन्हाळ्यात दिवसाला २ ते ३ खजूर खाणे पुरेसे आहे. जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते.