sandeep Shirguppe
सीताफळामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने वाढत्या वयातील मुलांना सीताफळ खायला द्यावे.
आजारपणानंतर शरीरात अशक्तपणा आला असेल तर सीताफळ खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो.
छातीत धडधडणे ही लक्षणे जाणवत असतील तर हृदयाच्या मांसपेशीचे बळ सीताफळ वाढवते.
आम्लपित्त, शरीरात उष्णता जाणवणे, छातीत व पोटात जळजळ होणे ही लक्षणे जाणवत असल्यास सीताफळ खावे.
चक्कर आली असल्यास सीताफळाची पाने वाटून त्यांचा रस नाकात टाकावा. रुग्ण शुद्धीवर येतो.
सीताफळांच्या बियांची पूड रात्री झोपताना केसांना चोळून लावल्याने उवा मरतात.
बियांच्या या पूडमध्ये शिकेकाई घालून केस धुतल्यास केस स्वच्छ व चमकदार होतात.
अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस थोड्या थोड्या अंतराने पिण्यास द्यावा.