Anuradha Vipat
कोथिंबीर केवळ जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही, तर औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी कोथिंबीर घेतल्यास शरीराला कमालीचे फायदे मिळतात.
सकाळी कोथिंबीर खाल्ल्याने गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्या दूर होतात.
कोथिंबीर नैसर्गिक 'डाययुरेटिक' आहे. ती शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून किडनी स्वच्छ करण्यास मदत करते.
ज्यांना थायरॉईडची समस्या आहे, त्यांच्यासाठी सकाळी कोथिंबीर किंवा धन्याचे पाणी पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.
कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, जे मधुमेहींसाठी चांगले आहे.
यात 'व्हिटॅमिन ए' मोठ्या प्रमाणात असते, जे डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांच्या जळजळीपासून आराम देण्यास मदत करते.