Team Agrowon
तेलबिया पिकातील कारळा हे आरोग्याच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे पीक आहे. कारळा याला स्थानिक भाषेमध्ये खुरासणी, रामतीळ असेही म्हटले जाते.
कारळा बियांमध्ये ३५ ते ४० टक्के तेल, २० ते २५ टक्के प्रथिने, १० ते २० टक्के तंतुमय पदार्थ असून, १० टक्के आर्द्रता व १२ ते १८ टक्के विद्राव्य शर्करा असते.
महाराष्ट्रात नवरात्रात देवीच्या पुजेसाठी कारळ्याची फुले वापरतात. कारळ्याचे निकृष्ट दर्जाचे तेल वंगणासाठी वापरतात.
कारळ्याचा उपयोग हा खाद्यतेल, वंगण व रंगनिर्मिती, साबण निर्मिती, पक्षिखाद्य तयार करण्यासाठी होतो.
तेल काढणीनंतर उर्वरित पेंड ही सकस पशुखाद्य असून, त्यात ३१ ते ४० टक्के प्रथिने असतात.
कारळा तेलामध्ये लिनोलेईक आम्ल ७५ ते ८० टक्के व ओलिक आम्ल ५ ते ८ टक्के असून, हृदयरोग नियंत्रणासाठी उत्तम तेल मानले जाते.
कारळ्याचे तेल दिव्यात आणि साबणाकरिता वापरतात. ते संधिवातावरही गुणकारी असते.