sandeep Shirguppe
दूध आणि गूळ यांचे मिश्रण नैसर्गिक पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
दुधाला पूर्ण आहार म्हणतात, प्रथिने, कॅल्शियम, जीवनसत्वे आणि खनिजे असतात.
गुळात लोह, फॉस्फरस आणि इतर खनिजे असतात. शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात.
गूळ आणि दूध दोन्हीचे एकत्र सेवन केल्यास शरीरातील अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर होतील.
दूध आणि गूळ दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहे. दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते ज्यामुळे त्वचा मुलायम होते.
गुळामध्ये अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात.
गुळामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे भूक नियंत्रित करण्यात मदत करते.
दुधामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते. जे हाडे मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे असतात.