sandeep Shirguppe
वर्षानुवर्षांपासून आपण खोबरेल तेलाचा वापर आरोग्यदायी म्हणून केला जातो.
भारतीय लोक खोबरेल तेलाचा वापर केस, त्वचा आणि विविध गोष्टींसाठी करतात.
केसांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी खोबरेल तेल फायदेशीर ठरते.
खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचा मुलायम व चमकदार बनते.
एक चमचा खोबरेल तेलामध्ये १२ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स आणि १ ग्रॅम अनसॅच्युरेटेड फॅट्स असते.
खोबरेल तेलामध्ये फॅटी ऍसिड असतात. जे पुरळ, मुरुमांचे डाग, बॅक्टेरिया यांसारख्या त्वचेच्या संसर्गापासून सुटका करतात.
रात्री पाण्याने चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा. नंतर चेहरा कोरडा करा, त्यानंतर दोन थेंब खोबरेल तेलाने चेहऱ्याला मसाज करा.Coconut Oil
रात्रभर शांत झोप झाल्यानंतर सकाळी चेहरा धुवा, यामुळे तुमची त्वचा डागरहीत आणि चमकदार राहील.
तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून न घेता खोबरेल तेल लावल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. याची काळजी घ्या.