Anuradha Vipat
अनेकांना वाटतं की मिरची फक्त जिभेला चटके देते, पण आरोग्याच्या दृष्टीने ती एक 'सुपरफूड' ठरू शकते.
हिरव्या आणि लाल मिरचीमध्ये असणारे 'कॅप्सॅसिन' हे घटक अनेक आजारांवर गुणकारी ठरतात.
मिरचीमधील 'कॅप्सॅसिन' शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करते. यामुळे कॅलरीज लवकर जळतात.
मिरची रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि रक्त गोठण्यापासून रोखण्यास मदत करते.
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण जास्त असू शकते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
मिरचीमधील घटक नैसर्गिक 'पेनकिलर' म्हणून काम करतात. वेदना कमी करण्यासाठी मिरचीचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
तिखट मिरची खाल्ल्यावर मेंदूमध्ये 'एंड्रॉर्फिन' नावाचे हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे माणसाला उत्साही वाटते.