Anuradha Vipat
कारल्याचा रस स्वादुपिंडाला सक्रिय करतो, ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होते.
कारल्याचा रस यकृतामधील हानिकारक टॉक्सिन्स बाहेर काढून यकृत स्वच्छ करतो.
या रसातील अँटिऑक्सिडंट्स रक्तातील अशुद्धता दूर करतात, ज्यामुळे त्वचेचे आजार, खाज आणि फोड येण्याची समस्या कमी होते.
कारल्याच्या रसात कॅलरीज आणि फॅट्सचे प्रमाण अत्यंत कमी असते.
हा रस शरीरातील चयापचय क्रिया वेगवान करतो आणि त्यातील फायबरमुळे भूक लवकर लागत नाही.
यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्याने शरीराची संसर्गाशी लढण्याची ताकद वाढते.
कारल्याच्या रसातील नैसर्गिक गुणधर्मांमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्टतेचा त्रास दूर होतो.