sandeep Shirguppe
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराला बेलाचे पान अर्पण करण्यामागे मोठी श्रद्धा आहे. या बेलाच्या पानाचे आरोग्यदायी फायदेही आहेत.
मधुमेह असणाऱ्या लोकांनी बेलाचे कवळे पान खावे. त्यात मुबलक प्रमाणात फायबर आणि लॅक्सटिव गुणधर्म आहेत.
चेहऱ्यावरचे मुरुम कमी करण्यास बेलाची पानं बारीक करून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास उपयोग होतो.
केसांची मजबुती हवे असेल तर तुम्ही ही पेस्ट लावून केस स्वच्छ पाण्याने धुवू शकता. यामुळे केसांमधील कोंड्याची समस्या कमी होते.
ज्या लोकांना पोटासंबंधित किंवा पचनाशी संबंधित समस्या असेल तर त्यांच्यासाठी बेलाचे पान हे औषधापेक्षा कमी नाही.
बेलाचे पाने पाण्यात उकळून पिऊ शकता किंवा त्यांना बारीक करून किंवा चावून खाल्ल्यास समस्या दूर होतात.
वाईट कोलेस्ट्रॉलपासून ते हृदयापर्यंत अनेक आजारांमध्ये बेलाचे पान खूप फायदेशीर आहे.
अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यात खूप मदत करतात.