Mahesh Gaikwad
भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दती अस्तित्वात आहे. अनेकजण आजही डॉक्टरांकडे जाण्याआधी घरगुती आयुर्वेदीक उपचार घेतात.
औषधीय आणि आयुर्वेदीक गुणांनी भरपूर अशा अर्जुन झाडाची साल अनेक आरोग्याच्या समस्यांवर गुणकारी आहे.
अनेक गंभीर आजारांवरील उपचारासाठी अर्जुन झाडाच्या सालीचे सेवन केले जाते. ज्यामुळे गंभीर आजार बरे होण्यास मदत होते.
अर्जुनाच्या सालीमध्ये अँटी-इन्फ्लामेंटरी आणि अँटीऑक्सिडंट सारखे घटक आढळतात.
कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणासाठी आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी अर्जुनाची साल फायदेशीर आहे.
अर्जुनाची सालीचे सेवन तुम्ही काढा, पावडर किंवा चहाच्या स्वरूपात करू शकता. एक ग्लास पाण्यात अर्जुनाची साल घालून उकळून त्याचा काढा तयार करू शकता.
अर्जुन सालीचे सेवन करण्यापूर्वी आयुर्वेदीक तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.