Mahesh Gaikwad
भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदीक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. आयुर्वेदात अमरवेलचे विशेष महत्त्व आहे.
अमरवेलामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे याचे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात.
अमरवेलाचे पान, फळ, बिया आणि सालीचा वापर अनेक आजारांवर औषधे म्हणून केला जातो.
वैद्यकीय शास्त्रामध्ये अमरवेलापासून विविध प्रकारच्या आजारांवरील औषधे तयार केली जातात.
अमरवेलमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट, व्हिटामिन सी आणि इतर पोषक तत्त्व असतात. जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
अमरवेलचे सेवन केल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याशिवाय लठ्ठपणा, मधुमेह आणि संसर्गामध्येगी अमरवेल अत्यंत गुणकारी आहे.
याशिवाय अपचन, बध्दकोष्ठ आणि पित्त सारख्या पोटाच्या संबंधित समस्यांमध्ये अमरवेलचे सेवन केल्यास फायदा होतो.
अमरवेलमधील अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लामेटरी गुण तोंड येण्याच्या समस्येवर फायदेशीर ठरतात. ही बातमी सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.