Mahesh Gaikwad
शाही जेवणांमध्ये केसरचा वापर पदार्थांवर गार्निशिंगसाठी केला जातो. केसरमुळे पदार्थांची चव आणि सुगंध वाढतो.
केसर ही एक शक्तीशाली औषधी वनस्पतीपैकी एक आहे. केसरचे आपल्या आरोग्यासाठी असंख्य असे फायदे आहेत.
आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे सर्व आवश्यक असे पोषक घटक केसरमध्ये असतात.
केसरमध्ये असणाऱ्या कोर्बोहायड्रेट्स शरीराला उर्जा देण्याचे काम करतात. याशिवाय केसरमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस, अँटीऑक्सिडंट याशिवाय जीवनसत्त्वे असतात.
केसरमध्ये अँटी-डिप्रेसेंट गुणधर्म असतात, जे तुमची झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करता.
औषधी गुणांनी भरपूर केसरच्या सेवनामुळे बध्दकोष्ठ, अपचन, गॅस यासारख्या पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
केसरमधील क्रोसिन आणि सॅफ्रानल सारखे कॅरोटेनॉयड्स असतात, जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर असतात.
याशिवाय केसरमध्ये अॅक्टिव्ह कंपाउंड्स असतात, जे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यासह तुमचा मूडही फ्रेश ठेवतात.
केसरमधील क्रोसिन आणि क्रोसेटिन ही दोन रसायने मेंदूच्या कार्यास चालना देतात, ज्यामुळे आपल्याला शिकण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.