Mahesh Gaikwad
सकाळी उपाशीपोटी लसूण खाण्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पण याचा काही प्रमाणात हानिकारकही परिणाम होऊ शकतो.
उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी लसूण उपयुक्त आहे. लसणाच्या सेवनामुळे ह्रदयाची कार्यक्षमता सुधारते.
उपाशीपोटी लसूण खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरातील रक्तवाहिन्यांमधील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते.
सर्दी-खोकल्यासाठी लसूण उपयुक्त आहे. उपाशीपोटी सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि आजारांपासून शरीराचे संरक्षण होते.
वजन कमी करण्यासाठी उपाशीपोटी लसूण खाणे फायदेशीर ठरते. यामुळे मेटाबॉलिझम वाढते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जळण्यास मदत होते.
उपाशीपोटी लसूण खाण्यामुळे बऱ्याचदा पचनाची समस्या उद्भवते. रिकाम्यापोटी सेवन केल्यामुळे जळजळ होणे, अपचन किंवा पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
याशिवाय लसूण खाण्यामुळे रक्तस्त्राव वाढू शकतो. शरीराची एखादी जखम लवकर भरून येत नाही.
उपाशीपोटी लसूण खाणे फायदेशीर असले, तरी योग्य प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.