sandeep Shirguppe
पॉपकॉर्न खाण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये फायबर, पॉलिफेनिलिक कंपाऊंड, ॲंटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटॅमिन बी, मॅग्नेशिअम असते.
पॉपकॉर्न खाल्याने वजन कमी होण्यातही मदत मिळते, तसेच फॅट कमी असल्याने स्थुलता वाढत नाही.
पॉपकॉर्न आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते, तसेच यामुळे आपली पचनक्रियाही चांगली राहते.
पॉपकॉर्नमध्ये ॲंटी-ऑक्सिडेंट गुणधर्म असल्याने डोळ्यांची जळजळ होणे, डोळे सुजणे अशा समस्या कमी होऊ शकतात.
पॉपकॉर्नमध्ये व्हिटॅमिन बी, बी 3, बी 6 असते, ज्यामुळे शरीरात ऊर्जा कायम राहते.
पॉपकॉर्न खाल्याने डिप्रेशन (नैराश्य्) कमी होण्यास मदत होऊ शकते.
पॉपकॉर्न रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकते.
पॉपकॉर्नच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या समस्या कमी होतात.