Crack Heels Remedies : उष्णतेमुळे टाचांना भेगा पडतायंत? ट्राय करा सोपे घरगुती उपाय

Mahesh Gaikwad

टाचांना भेगा

उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णतेमुळे अनेकांना टाचांना भेगा पडण्याची समस्या होते. या भेगांमुळे असह्य अशा वेदनाही होतात.

Crack Heels Remedies | Agrowon

कोरडी त्वचा

उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे टाचा कोरड्या होऊन भेगा पडतात.

Crack Heels Remedies | Agrowon

त्वचा कडक होते

अशावेळी चपलांचा वापर, धूळ आणि घाम यामुळे हा त्रास अजूनच वाढतो. तसेच जास्त वेळ उघड्या अनवाणी चालण्यामुळे त्वचा कडक होते आणि भेगा पडतात.

Crack Heels Remedies | Agrowon

नारळाचे तेल

रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय स्वच्छ धुवून कोरड्या कपड्याने पुसा. त्यानंतर पायांना आणि टाचेला हलक्या हाताने नारळाचे तेल लावा.

Crack Heels Remedies | Agrowon

लिंबू ग्लिसरीन

लिंबाचा रस आणि ग्लिसरीन एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी टाचांवर लावा. यामुळे टाचेची त्वचा मऊ होते आणि भेगा भरून येण्यास मदत होते.

Crack Heels Remedies | Agrowon

कापूर खोबरेल तेल

एक चमचा खोबरेल तेलामध्ये १ चिमूट कापूर मिक्स करून टाचांवर हलक्या हाताने मसाज करा. हे अँटीसेप्टिक चे काम करते आणि फाटलेली त्वचा लवकर भरते.

Crack Heels Remedies | Agrowon

त्वचेला पोषण

दुधाची साय आणि हळद एकत्र करून ही पेस्ट टाचेच्या भेगांवर लावा. यामुळे त्वचेला पोषण मिळते व जंतुसंसर्ग टाळता येतो.

Crack Heels Remedies | Agrowon

केळ तेलाचे मिश्रण

पिकलेले केळ स्मॅश करून त्यात खोबरेल तेला घाला. हे मिश्रण भेगा पडलेल्या टाचेला लावा. यामुळे त्वचा मऊ पडते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Crack Heels Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....