Anuradha Vipat
चहा किंवा कॉफी अचानक बंद केल्यावर डोकेदुखी होणे हे एक अतिशय सामान्य लक्षण आहे.
चला तर मग आज आपण पाहूयात चहा बंद केल्यावर डोकं दुखण्यामागची प्रमुख कारणे कोणती.
चहामधील 'कॅफिन' मेंदूला उत्तेजित करण्याचे काम करते. जेव्हा तुम्ही रोज चहा पिता, तेव्हा मेंदूला त्याची सवय होते.
कॅफिनमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या अरुंद होतात. चहा बंद केल्यावर या रक्तवाहिन्या अचानक रुंदावतात.
कॅफिन मेंदूतील 'अॅडेनोसिन' (ज्यामुळे थकवा जाणवतो) या घटकाला रोखून धरते.
चहा पिण्यामुळे मेंदूत 'डोपामाइन' नावाचे आनंदी संप्रेरक स्रवते.
अनेकदा लोक चहाऐवजी पाणी पिण्याचे प्रमाण वाढवत नाहीत, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन डोके दुखू शकते.