Roshan Talape
आधुनिक आणि प्रगत शेती करायची असेल किंवा शेती क्षेत्रात करिअर, विकास करायचा असेल तर शेतीचे ज्ञान, योग्य शिक्षण आणि अनुभव असणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वोत्तम 'NRIF' मानांकनातील ७ महाविद्यालये पाहूयात...
IARI ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR)अंतर्गत येते. IARI भारतातील पहिल्या क्रमांकाची संशोधन संस्था आहे. या संस्थेमुळे कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे, यामुळे देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले गेले आहे.
हे महाविद्यालय भारतातील डेअरी क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावरील ही NDRI संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत येते.
पंजाब राज्यातील लुधियाना येथे स्थित पंजाब कृषी विद्यापीठ कृषी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. त्याचबरोबर कृषी क्रांतीत महत्त्वाच्या भूमिकेत असणारे विद्यापीठ म्हणून याची ओळख आहे.
वाराणसी येथे स्थित असलेले हे विद्यापीठ कृषी आणि संबंधित क्षेत्रांमध्ये उत्तम शिक्षण आणि संशोधनासाठी ओळखले जाते. तसेच हे भारतातील कृषी शिक्षणात चौथ्या क्रमांकाचे हे विद्यापीठ आहे.
IVRI अर्थात ही भारतातील एक प्रमुख पशुवैद्यकीय संशोधन संस्था आहे. NIRF रॅंकिगनुसार पाचव्या क्रमांकावरील ही संस्था आहे. या संस्थेचा उद्देश पशुवैद्यक विज्ञानात उच्च शिक्षण, संशोधन आणि पशुपालनाच्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान विकसित करणे हे आहे.
कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणारे हे विद्यापीठ कोयंबतूर येथे आहे. NIRF रॅंकिगनुसार सहाव्या क्रमांकावर हे विद्यापीठ येते.
भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे चौधरी चरणसिंह विद्यापीठ हे NIRF मानांकनानुसार सातव्या क्रमांकावर आहे. या विद्यापीठातील संशोधन आणि कार्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीत सुधारणा घडवून आणण्यास मदत झाली आहे.