Armadillo : निसर्गत:च 'बुलेटप्रुफ' कवच असलेला प्राणी तुम्ही पाहिलाय का?

Mahesh Gaikwad

निसर्गातील प्राणी

निसर्गामध्ये विविध प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. निसर्गात अनेक चित्र-विचित्र प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजातीही आढळतात.

Armadillo | Agrowon

प्राण्यांची ओळख

काही प्राणी आपल्या रंगामुळे, आकारामुळे किंवा विचित्र पध्दतीच्या आवाजामुळे ओळखले जातात.

Armadillo | Agrowon

प्राण्यांमधील विशेष गुण

निसर्गाने प्रत्येक प्राण्यामध्ये काही ना काही विशेष गुण दिलेले असतात. आज आपण अशाच एका प्राण्याविषयी माहिती घेणार आहोत.

Armadillo | Agrowon

बुलेटप्रुफ कवच

निसर्गत:च पाठीवर बुलेटप्रुफ कवच असलेल्या या प्राण्याचे नाव आहे आर्मडिलो. या प्राण्याच्या पाठीवर कवचामुळे याला धोक्यापासून बचाव करण्यास मदत होते.

Armadillo | Agrowon

आर्मडिलो प्राणी

आर्मडिलोचे कवच इतके कठीण असते की, त्यावर बंदुकीच्या गोळीचाही परिणाम होत नाही. म्हणूनच याला बुलेटप्रुफ कवचाचा प्राणी असेही म्हणतात.

Armadillo | Agrowon

शरीर लपवतो

धोक्याची जाणीव होताच आर्मडिलो प्राणी आपले शरीर आपल्या पाठीच्या कवचाच्या आतमध्ये लपवतो.

Armadillo | Agrowon

१५ वर्ष आयुष्य

हा प्राणी आकाराने अगदीच छोटा असतो. आर्मडिलो या प्राण्याचे आयुष्य १५ वर्षांपर्यंत असते. हा प्राणी दिवसातील १६ तास झोपतो.

Armadillo | Agrowon

शुभंकर चिन्ह

हा प्राणी प्रामुख्याने दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतो. २०१४ मध्ये ब्राझिल येथे झालेल्या फुटबॉल विश्व चषकाचा आर्मडिलो हा शुभंकर चिन्ह (Mascot) होता.

Armadillo | Agrowon

वास घेण्याची क्षमता

आर्मडिलो प्राण्याची दृष्टी कमजोर असते. परंतु वास घेण्याची क्षमता अफाट असल्याने तो वासाने आपल्या भक्ष्याची शिकार करतो.

Armadillo | Agrowon