Swarali Pawar
सध्या हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून पिके काढणीला आली आहेत. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने काढणी केल्यास धान्याचे नुकसान कमी होते आणि टिकवणक्षमताही वाढते.
तापमान वाढत असल्यामुळे पिकांना महत्त्वाच्या टप्प्यावर वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे.
सिंचन शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी केल्यास पिकांना अधिक फायदा होतो.
लवकर पेरलेल्या गव्हात दाण्यातील ओलावा सुमारे १५% असताना काढणी करावी.
पूर्ण पक्व होण्याच्या २–३ दिवस आधी कापणी केल्यास दाणे झडण्याचे नुकसान टाळता येते.
मक्याची कणसे पिवळी होऊन दाणे कडक झाल्यावर कणसे खुडून काढावीत. कणसे २–३ दिवस उन्हात वाळवून मग दाणे वेगळे करून साठवण करावी.
हरभरा साधारण ११० ते १२० दिवसांत तयार होतो आणि घाटे वाळल्यानंतर काढणी करावी. धान्य ५–६ दिवस उन्हात वाळवून साठवताना कडुलिंबाचा पाला घातल्यास कीड कमी लागते.
करडई पिकाची पाने पूर्ण वाळल्यानंतर काढणी करणे योग्य ठरते. दाण्यातील ओलावा १२ ते १४% असताना हार्वेस्टरने काढणी केल्यास नुकसान कमी होते.
धान्य ११–१२%, कडधान्ये ९% आणि तेलबिया ८% ओलाव्यापर्यंत वाळवून साठवा.
भुईमुगाचे पीक ४५ दिवसांपर्यंत तणमुक्त ठेवण्यासाठी वेळोवेळी खुरपणी आणि कोळपणी करावी.