Anuradha Vipat
हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे
हे व्रत पार्वती मातेने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती या कथेवर आधारित आहे.
चला तर मग आज आपण हरतालिका व्रताच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते याविषयी थोडक्यात पाहूयात.
शंकर आणि पार्वतीची मूर्ती, चौरंग, केळीचे खांब, धूप-दीप, नैवेद्य, बेल, आघाडा, तुळस, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई यांसारखी झाडांची पाने व फुले.
सर्वप्रथम स्वच्छ जागेवर चौरंग मांडा आणि त्याला केळीच्या खांबांनी सजवा
चौरंगावर पार्वती आणि शंकराची मूर्ती स्थापित करा. धूप-दीप लावा, नैवेद्य दाखवा.
विविध प्रकारची पत्री आणि फुले वाहून पूजा करा.