Anuradha Vipat
आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे.
मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजेच मोबाईल रेडिएशनचे शरीरावर अनेक वाईट दुष्परिणाम होऊ शकतात.
दीर्घकाळ आणि चुकीच्या पद्धतीने मोबाईल वापरल्याने खालील आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने त्यातून निघणारा निळा प्रकाश शरीरातील 'मेलाटोनिन' या झोपेच्या हार्मोनची निर्मिती थांबवतो.
तासनतास मोबाईलवर बोलण्याने किंवा तो डोक्याजवळ धरून ठेवल्याने मेंदूच्या पेशींवर ताण येतो. यामुळे सतत डोकेदुखी, चिडचिड आणि मानसिक थकवा जाणवतो.
मोबाईलच्या स्क्रीनकडे सतत एकटक पाहिल्याने डोळ्यांचे स्नायू आखडतात. यामुळे डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे आणि हळूहळू दृष्टी कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.
अनेक पुरुष मोबाईल पँटच्या खिशात ठेवतात. संशोधनानुसार, खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या रेडिएशनमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि त्यांची गुणवत्ता कमी होऊ शकते.