Anuradha Vipat
बाजारात मिळणाऱ्या बहुतांश शॅम्पूंमध्ये सल्फेट , पॅराबेन्स , आणि सिलिकॉन यांसारखी घातक रसायने असतात.
केमिकल शॅम्पू तात्पुरते केस स्वच्छ करत असले, तरी दीर्घकाळात त्यांचे केसांवर अत्यंत वाईट परिणाम होतात.
रासायनिक शॅम्पूमध्ये असलेल्या 'सल्फेट'मुळे जास्त फेस तयार होतो. हा फेस केसांमधील नैसर्गिक ओलावा आणि तेल पूर्णपणे शोषून घेतो.
रसायनांमुळे केसांची मुळे अत्यंत कमकुवत होतात. काही शॅम्पू मधील प्रखर केमिकल्स केसांच्या फॉलिकल्सना कायमचे नुकसान पोहोचवतात.
शॅम्पूमध्ये वापरले जाणारे सिंथेटिक रंग, कृत्रिम सुगंध आणि प्रिजर्व्हेटिव्ह्ज टाळूच्या पेशींना हानी पोहोचवतात. यामुळे केसांमधील नैसर्गिक काळा रंग देणारे 'मेलानिन' कमी होते
रासायनिक घटकांमुळे केस धुवूनही डोक्यात सतत कोंडा होणे, तीव्र खाज सुटणे किंवा टाळूला लालसरपणा येणे अशा ॲलर्जी सुरू होतात.
पोषण न मिळाल्यामुळे केसांची टोके दुभंगतात ज्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ पूर्णपणे खुंटते.