Smartphone Addiction : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरण्याचे ५ भयंकर दुष्परिणाम

Anuradha Vipat

ताण

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर प्रचंड ताण पडतो.

Smartphone Addiction | Agrowon

सामान्य

आजच्या डिजिटल युगात ही सवय अतिशय सामान्य झाली असली तरी ती शरीराला आतून पोखरत आहे.

Smartphone Addiction | agrowon

निद्रानाश

मोबाईलच्या स्क्रीनमधून 'ब्लू लाईट'बाहेर पडतो. हा प्रकाश मेंदूला दिवसाचा भास करून देतो. परिणामी गाढ आणि शांत झोप येत नाही.

Smartphone Addiction | agrowon

डोळ्यांचे आजार

मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे डोळे कोरडे पडणे , डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे आणि हळूहळू दृष्टी कमकुवत होण्याचा मोठा धोका असतो.

Smartphone Addiction | agrowon

मानसिक तणाव आणि चिडचिड

झोपण्यापूर्वी सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे मन शांत होण्याऐवजी मनात विचारांचे चक्र सुरू होते, ज्यामुळे मानसिक तणाव, चिंता आणि चिडचिड वाढते.

Smartphone Addiction | Agrowon

वजन आणि लठ्ठपणा

झोप अपुरी झाल्याने रात्रीच्या वेळी अवेळी भूक लागते आणि माणूस जास्त कॅलरी असलेले पदार्थ खातो, ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी वेगाने वाढते.

Smartphone Addiction | Agrowon

मेंदूची कार्यक्षमता

रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोके जड वाटणे आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे अशा समस्या जाणवू लागतात.

Smartphone Addiction | Agrowon

Stop Negative Thinking : नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या मानसिक टिप्स

Stop Negative Thinking | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...