Anuradha Vipat
दिवाळीच्या काळात फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर आणि घातक वायू लहान मुलांच्या आरोग्याला जास्त हानी पोहोचवतात.
मुलांची फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसल्यामुळे त्यांना याचा त्रास लवकर होतो.
फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांना खोकला, घशात खवखव, धाप लागणे आणि दम्याचा त्रास वेगाने उद्भवू शकतो.
हवेतील प्रदूषकांमुळे मुलांचे डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे आणि खाज सुटणे अशा ॲलर्जी सुरू होतात.
हवेत पसरलेल्या केमिकलच्या कणांमुळे लहान मुलांच्या नाजूक त्वचेवर रॅशेस किंवा खाज येऊ शकते.
सतत प्रदूषित हवेत राहिल्याने मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत होते, ज्यामुळे सण संपल्यानंतरही त्यांना सर्दी-खोकला बरा होण्यास वेळ लागतो.
दिवाळीच्या दिवसांत संध्याकाळी जेव्हा फटाके जास्त वाजवले जातात, तेव्हा मुलांना बाहेर नेताना चांगल्या दर्जाचा N95 मास्क आवर्जून घाला.