Mahesh Gaikwad
पाणी म्हणजे जीवन. शरीरासाठी पाणी पिणे आवश्यक असले, तरी अतिप्रमाणात पाणी पिल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. पाहूयात जास्त पाणी पिल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम.
अति प्रमाणात पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियमची पातळी कमी होते. परिणामी शरीराची ऊर्जा कमी वाटते. तसेच थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे किडनीवर ताण येवू शकतो. परिणामी किडनीची कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता बळावते.
अति प्रमाणात पाणी पिल्याने रक्तदाब वाढू शकतो. ज्यामुळे ह्रदयावर ताण येवून ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो.
जास्त प्रमाणात पाण्या पिल्यामुळे मेंदूवर परिणाम होवू शकतो. मेंदूवर सूज येवून गोंधळल्यासारखे, अस्वस्थत वाटते.
अति पाणी पिल्याने वारंवार लघवीला लागते. यामुळे झोपेच्या वेळेवर परिणाम होतो. शरीर उर्जावान वाटत नाही. शरीरात थकवा जाणवतो.
जास्त पाणी प्यायल्याने पचनसंस्थेवर ताण येवून अन्न पचनास अडचणी येते. परिणामी पित्ताचा त्रास होतो.
अति पाणी पिणे आरोग्याला हानिकारक ठरू शकते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि तहान लागल्यावरच पाणी प्यायला हवे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.