Worlds Fastest Bird : जगातील सर्वात वेगवान पक्षी ; हवेतून थेट शिकारीवर घालतो झडप

Mahesh Gaikwad

सर्वात वेगाने उडणारा पक्षी

जगात सर्वात वेगाने धावणारा प्राणी कोणता असे विचारल्यावर आपल्याला लगेच चित्ता हा प्राणी आठवतो. पण जगातील सर्वात वेगाने उडणाऱ्या पक्ष्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Cheetah | Agrowon

Peregrine Falconशाहीन घार

पेरिग्रिन फाल्कन हा जगातील सर्वात वेगाने उडणारा पक्षी आहे. यालाच मराठीमध्ये शाहीन घार असेही म्हटले जाते.

Peregrine Falcon | Agrowon

ताशी वेग

पेरिग्रिन फाल्कन हवेत झेपावताना तब्बल ३८९ किमी प्रती तास या वेगाने उडू शकतो.

Peregrine Falcon | Agrowon

हवेतून शिकारीवर झडप

हा पक्षी स्टूप डाईव्ह तंत्राचा वापर करून कितीही उंचीवर असला, तरी हवेतल्या हवेत किंवा जमिनीवरील आपल्या शिकारीवर झडप घालू शकतो.

Peregrine Falcon | Agrowon

डोळ्यांची क्षमता

पेरिग्रिन फाल्कनच्या डोळ्यांची क्षमता माणसांपेक्षा २५ पट अधिक असते. हवेतून शिकारीवर झडप घालताना हा पक्षी २५ जी-फोर्सचा सामना करू शकतो.

Peregrine Falcon | Agrowon

शरीराची रचना

पेरिग्रिन फाल्कन पक्ष्याचे शरीर हलके आणि त्याच्या पंखांची रचना एरोडायनामिक पध्दतीची असल्यामुळे प्रचंड वेग धारण करता येतो. डोळ्यावरील विशेष पडद्यामुळे वेगाने उडताना धूळ आणि वाऱ्यापासून संरक्षण होते.

Peregrine Falcon | Agrowon

कुठे आढळतो?

अंटार्टिका वगळता जगातील सर्व खंडावंर पेरिग्रिन फाल्कन पक्षी आढळतो. डोंगराळ भाग, समुद्रकिनारे याशिवाय शहरातील उंच इमारतींवर आढळून येतो.

Peregrine Falcon | Agrowon

पक्ष्याचे आयुष्य किती?

या पक्ष्याचे आयुर्मान १५ ते २० वर्षांपर्यंत असते. तो सहसा डोंगरांच्या कड्यांवर किंवा उंच इमारतींवर आपले घरटे तयार करतो आणि दरवर्षी ३-५ अंडी घालतो.

Peregrine Falcon | Agrowon

संरक्षित प्रजाती

काही वर्षांपूर्वी कीटकनाशकांमुळे या पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाली होती. त्यामुळे संरक्षित प्रजातींच्या यादीमध्ये याचा समावेश करण्यात आला होता. पंरतु आता यांची संख्या वाढते आहे.

Peregrine Falcon | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....