sandeep Shirguppe
काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात.
काळ्या तिळात कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, फॉस्फरसयामध्ये पोटॅशियम आणि झिंक सारख्या खनिजे भरपूर असतात.
सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.
दररोज सुमारे १० ते १२ काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि बीपी नियंत्रित राहतो.
ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे लाल होण्याची समस्या असते त्यांनी आहारात काळ्या तिळाचा समावेश करावा.
काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवा त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खाल्ल्यास पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल.
काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही त्यांनी काळ्या तिळाचा वापर करावा.
दोन ते तीन ग्रॅम काळे तीळ दररोज खाल्ल्याने खराब कोलेस्टेरॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात.