Swarali Pawar
प्रत्येक पिकाला वेगवेगळी जमीन लागते. जमिनीच्या प्रकारानुसार पीक निवडल्यास उत्पादन आणि नफा दोन्ही वाढतात.
हलकी जमीन वालुकामय किंवा मुरमाड असते आणि पाणी लवकर झिरपते. या जमिनीत बाजरी, तीळ, कुळीथ आणि कमी कालावधीचा भाजीपाला चांगला येतो.
हलकी जमीन फळबागांसाठीही उपयोगी ठरू शकते. सीताफळ, आवळा, बोर आणि कारळ ही पिके कमी पाण्यातही चांगली वाढतात.
मध्यम जमिनीत पाण्याचा निचरा आणि ओलावा दोन्ही संतुलित राहतात. सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद आणि भूईमूग या जमिनीत चांगले येतात.
डाळिंब, पेरू, लिंबू आणि आवळा या जमिनीत चांगली वाढतात. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनही भरघोस मिळू शकते.
भारी जमीन पाणी जास्त काळ धरून ठेवते आणि खोल असते. ऊस, कापूस, केळी, हळद आणि तूर या पिकांसाठी ही जमीन फायदेशीर ठरते.
आंबा, चिकू, संत्री आणि मोसंबी या जमिनीत उत्तम वाढतात. पण पाण्याचा निचरा नीट नसेल तर मुळे कुजण्याचा धोका वाढतो.
पाणथळ किंवा चोपण जमिनीत भाताचे पीक चांगले येते. योग्य निचरा असेल तर ऊस आणि चारा पिकेही फायदेशीर ठरू शकतात.