Anuradha Vipat
हात धुवल्यानंतर किंवा काम झाल्यावर मॉइश्चरायझर लावा. कोरड्या त्वचेसाठी जाड क्रीम किंवा लोशन वापरा.
आठवड्यातून एकदा हाताला स्क्रब करा. साखर आणि मध मिक्स करून स्क्रब तयार करा.
बीट आणि साखरेचे मिश्रण देखील हातासाठी चांगले आहे. स्क्रबने हातांना हलक्या हाताने मसाज करा.
उन्हात बाहेर जाताना हाताला सनस्क्रीन लावा, स्कार्फने हात झाका
हात वारंवार साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवा.बाहेरून आल्यावर किंवा काही काम केल्यावर हात स्वच्छ करायला विसरू नका.
हात धुण्यासाठी गरम पाणी आणि सौम्य साबण वापरा. साबण जास्त वेळ हातावर ठेऊ नका
कोरफड जेल हाताला लावल्यास त्वचा मऊ होते.