Anuradha Vipat
हाताचे टॅनिंग किंवा काळवंडलेली त्वचा पूर्णपणे घालवणे कठीण आहे कारण टॅनिंग ही त्वचेच्या आतल्या थरात झालेली हानी असते
काही झटपट उपाय वापरून तुम्ही हाताचे टॅनिंग नक्कीच कमी करू शकता आणि त्वचेचा रंग उजळवू शकता.
साखर घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिसळा. ही पेस्ट हातावर लावा आणि हलक्या हाताने १० मिनिटे स्क्रब करा.
दही घ्या त्यात हळद आणि बेसनमिसळा. हा पॅक हातावर लावा आणि १० ते १५ मिनिटे ठेवा.
टोमॅटोचा रस हातावर आणि काळवंडलेल्या त्वचेवर १० मिनिटे चोळा. नंतर थंड पाण्याने धुवा.
बटाट्याचा रस हातावर ५ ते १० मिनिटे चोळा. सुकल्यावर पाण्याने धुवा.
टॅनिंग टाळण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी नेहमी सनस्क्रीन लोशन लावा.