Anuradha Vipat
तुमच्या हाताच्या रेषा केवळ तुमचे भविष्यच नाही, तर तुमच्या आरोग्याचे अनेक महत्त्वाचे संकेत देतात.
हातावरील विविध रेषा आणि उंचवटे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांशी जोडलेले असतात.
जर तुमची जीवनरेषा स्पष्ट, न तुटलेली आणि गुलाबी रंगाची असेल, तर ते उत्तम आरोग्याचे लक्षण आहे.
जर जीवनरेषा मध्येच तुटलेली असेल किंवा त्यावर साखळीसारखी चिन्हे असतील, तर ते वारंवार आजारपण दर्शवते.
नखे खूप पांढरी असल्यास ते रक्ताल्पता किंवा यकृताच्या समस्यांचे संकेत असू शकतात.
शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा हृदयाशी संबंधित समस्या असल्यास नखे निळसर दिसू शकतात.
हा उंचवटा अधिक फुगीर असेल तर पचनसंस्थेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.