Anuradha Vipat
हिरवी मिरचीचे सेवन करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. हिरवी मिरची खाणाऱ्यांनी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
जर तुम्हाला तिखटपणाचा त्रास होत असेल तर मिरचीच्या बिया काढून टाका. तिखटपणा बियांमध्ये असतो.
आरोग्यदृष्ट्या वाळलेल्या लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची केव्हाही चांगली असते.
दिवसातून २ ते ३ पेक्षा जास्त हिरव्या मिरच्या खाणे टाळावे.
जर तुम्हाला मिरची खाल्ल्यानंतर खूप जळजळ होत असेल तर पाणी पिण्याऐवजी थंड दूध किंवा दही घ्यावे.
काही आरोग्य समस्या असतील तर हिरवी मिरची खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
ज्यांना अल्सर, ॲसिडिटी किंवा मूळव्याध आहे त्यांनी हिरवी मिरची खाणे टाळावे.