Anuradha Vipat
हेअर सीरम वापरल्याने केस मऊ आणि चमकदार होतात परंतु ते लावताना योग्य पद्धतने लावणे आवश्यक आहे.
सीरम कधीही केसांच्या मुळांना लावू नका. ते मुळांना लावल्याने डोक्याची त्वचा तेलकट होऊ शकते.
सीरम लावण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे केस धुऊन झाल्यानंतर जेव्हा ते थोडे ओले (Damp) असतात.
तुमच्या केसांच्या लांबीनुसार फक्त १ ते २ थेंब सीरम पुरेसे असते.
गुंता झालेले केस विंचरण्यापूर्वी सीरम लावल्याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि गुंता सहज सुटतो.
तुमचे केस कुरळे, कोरडे की सरळ आहेत, यानुसार योग्य सीरम निवडा.
जर तुम्ही हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरणार असाल, तर त्यापूर्वी सीरम लावणे आवश्यक आहे.