Anuradha Vipat
केसांच्या चांगल्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी योग्य तेलाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
तेल केसांना पोषण देतात, टाळूचे आरोग्य सुधारतात आणि केसांची मुळे मजबूत करतात.
खोबरेल तेल केसांसाठी अमृतासारखे आहे. हे तेल केसांमधील प्रोटीन कमी होण्यापासून रोखते. हे केसांची वाढ होण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.
एरंडेल तेल खूप घट्ट असते आणि त्यात 'रिसिनोलिक ऍसिड' असते, जे केसांच्या वाढीस चालना देते.
आवळा तेल केसांच्या अकाली पांढरेपणाला थांबवते आणि केसांची वाढ जलद करते.
बदाम तेल केसांना चमकदार बनवते, मऊ करते आणि केसांचे पोषण करते.
कडुलिंबाचे तेल टाळूवरील कोंडा आणि बुरशीच्या उपचारांसाठी उत्तम आहे.