Anuradha Vipat
केस कापल्याने किंवा ट्रिम केल्याने ते लवकर वाढतात हा एक मोठा गैरसमज आहे.
विज्ञानानुसार, केस कापण्याचा आणि त्यांच्या वाढीच्या वेगाचा थेट संबंध नाही.
केसांची वाढ टाळूच्या खाली असलेल्या 'हेअर फॉलिकल्स'मधून होते केसांच्या टोकांकडून नाही.
साधारणपणे एका व्यक्तीचे केस दरमहा १ ते १.५ सेमी या ठराविक वेगाने वाढतात.
केसांच्या टोकांना फाटे फुटले असतील तर ते वरपर्यंत वाढत जातात आणि केस कमकुवत करतात.
खराब झालेली टोके कापल्यामुळे केस मधूनच तुटण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे केसांची लांबी टिकून राहण्यास मदत होते
ट्रिमिंगमुळे केसांचा पोत सुधारतो आणि ते अधिक दाट व निरोगी दिसू लागतात