Anuradha Vipat
आजच्या काळात केस गळती, केस वाढ न होणे, टक्कल पडणे , केस पातळ होणे या समस्या सामान्य झाल्या आहेत.
आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला एका उत्तम घरगुती उपायाबद्दल सांगणार आहोत जो तुमचे केस मुळांपासून लांब, जाड, काळे आणि मजबूत बनवेल.
कढीपत्ता केसांच्या वाढीसाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी देखील खूप प्रभावी आहे. तहे कढीपत्ता तेल केसांसाठी टॉनिकसारखे काम करते.
आवळ्यामुळे केस काळे, लांब आणि मजबूत होतात. आवळा पावडर खोबरेल तेलात मिसळा आणि केसांना मसाज करा.
केस लांब, काळे आणि जाड करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर केला जाऊ शकतो. मेथी दाणे खोबरेल तेलात शिजवून केसांना लावा.
बदाम तेल निरोगी आणि कोरड्या केसांसाठी फायदेशीर आहे.बदाम तेल केसांना पोषण आणि मजबूत करते
खोबरेल तेल केसांना हलके मसाज करत लावल्याने केस मऊ होतात.