Anuradha Vipat
तुमच्या या सवयींमुळे केसांचे आरोग्य नकळत बिघडू शकते. केस गळणे आणि फाटे फुटणे टाळण्यासाठी या चुका त्वरित टाळा:
केस ओले असताना कंगवा वापरल्याने केस मुळापासून तुटतात. केस पूर्ण सुकल्यावरच मोठ्या दातांचा कंगवा वापरावा.
खूप गरम पाण्याने केस धुतल्याने स्कॅल्पमधील नैसर्गिक ओलावा निघून जातो, ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात.
ओले केस टॉवेलने रगडल्याने केसांच्या क्यूटिकल्सचे नुकसान होते आणि केस गुंता होऊन तुटतात.
हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनरचा वारंवार वापर केसांमधील प्रथिने नष्ट करतो.
केस सतत घट्ट पोनीटेल किंवा अंबाड्यात बांधल्याने मुळांवर ताण येतो ज्यामुळे कपाळाकडील केस कमी होऊ लागतात.
यामुळे उशीसोबत केसांचे घर्षण होऊन ते तुटतात. शक्यतो सैल वेणी घालून किंवा सॅटीन/सिल्क उशीच्या कव्हरचा वापर करावा.