Hair Care After Straightening : केसांची स्ट्रेटनिंग केल्यानंतर काळजी कशी घ्यावी?

Anuradha Vipat

योग्य काळजी

केसांची स्ट्रेटनिंग केल्यानंतर केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

Hair Care After Straightening | agrowon

केस ओले करू नका

स्ट्रेटनिंग केल्यानंतर पहिले ३ दिवस (७२ तास) केसांना पाणी लावू नका. पाऊस, वाफ किंवा घामापासूनही केस वाचवा.

Hair Care After Straightening | agrowon

केस बांधू नका

पहिले ३ दिवस केस मोकळे ठेवा. रबर बँड, हेअर पिन किंवा क्लिप लावू नका. केस कानामागे सारणेही टाळा.

Hair Care After Straightening | agrowon

सरळ झोपा

झोपताना केस पाठीमागे सरळ राहतील याची काळजी घ्या, जेणेकरून झोपेत केसांना घड्या पडणार नाहीत.

Hair Care After Straightening | agrowon

शॅम्पूचा वापर

नेहमीच्या शॅम्पूऐवजी तुमच्या हेअर स्टायलिस्टने सुचवलेला सल्फेट-फ्री आणि पॅराबेन-फ्री शॅम्पू वापरा.

Hair Care After Straightening | agrowon

कंडिशनर आणि मास्क

प्रत्येक वॉशनंतर कंडिशनर नक्की लावा. आठवड्यातून एकदा केसांना चांगला 'हेअर मास्क' लावा, ज्यामुळे केमिकलमुळे कोरड्या झालेल्या केसांना ओलावा मिळेल.

Hair Care After Straightening | agrowon

सिरमचा नियमित वापर

केस धुवून झाल्यानंतर ते हलके सुकवून ओल्या केसांवर हेअर सिरम नक्की लावा. यामुळे केस गुंतामुक्त राहतात आणि चमकतात.

Hair Care After Straightening | Agrowon

Traditional Marathi Look : सणांसाठी मराठमोळा लुक कसा करावा? फॅशन टिप्स

Traditional Marathi Look | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...