Anuradha Vipat
पुरुषांचा आत्मविश्वास केवळ त्यांच्या यशावर नाही, तर त्यांच्या दैनंदिन सवयींवर अवलंबून असतो.
इतर पुरुषांची प्रगती, शरीर किंवा पैसा पाहून स्वतःला कमी लेखल्याने आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट होतो.
"माझ्याकडून हे होणार नाही" किंवा "मी परफेक्ट नाही" असे स्वतःबद्दल सतत नकारात्मक बोलणे मानसिक खच्चीकरण करते.
व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार आणि अपुरी झोप यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते, ज्याचा थेट परिणाम आत्मविश्वासावर होतो.
नवीन गोष्टी करायला घाबरणे किंवा लोक काय म्हणतील या भीतीने मागे राहिल्याने पुरुष स्वतःची क्षमता विसरतात.
खांदे पाडून किंवा वाकून बसल्याने शरीरात 'कोर्टिसोल' वाढतो आणि आत्मविश्वास कमी दिसतो.
रोजची लहान कामे वेळेत पूर्ण करा. यामुळे मेंदूला यशाची सवय लागते.