Anuradha Vipat
जिममध्ये वर्कआउट करणे आरोग्यासाठी उत्तम आहे, पण चुकीच्या पद्धतीमुळे दुखापत होऊ शकते.
व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी १०-१५ मिनिटे वॉर्म-अप करणे अत्यंत गरजेचे आहे.
जास्त वजन उचलण्यापेक्षा व्यायाम योग्य पद्धतीने करण्यावर भर द्या.
पहिल्याच दिवशी खूप जड वजन उचलू नका. तुमच्या शरीराची क्षमता ओळखून हळूहळू वजन आणि व्यायामाचा वेळ वाढवा.
वर्कआउट दरम्यान शरीरातील पाणी कमी होते, म्हणून मध्ये-मध्ये थोडे थोडे पाणी पीत राहा.
दोन सेटच्या दरम्यान आणि दोन व्यायामाच्या दिवसांत शरीराला विश्रांती द्या.
व्यायामापूर्वी हलका आहार आणि व्यायामानंतर प्रथिने युक्त आहार घेतल्यास चांगले रिझल्ट मिळतात.