Anuradha Vipat
गुढीपाडव्याचा सण म्हणजे गोडधोड खाण्याचा दिवस! या खास मुहूर्तावर तुम्ही मलाई पेढा मिठाई नक्कीचं ट्राय करा.
मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क, साजूक तूप, वेलची पूड, सजावटीसाठी पिस्ता किंवा केशर.
एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात कंडेन्स्ड मिल्क आणि मिल्क पावडर घालून मंद आचेवर सतत हलवत राहा.
हे मिश्रण पॅन सोडू लागेपर्यंत (साधारण ५-७ मिनिटे) नीट परता. मिश्रण जास्त कडक होऊ देऊ नका.
आता त्यात वेलची पूड घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा. मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला थोडे तूप लावून त्याचे छोटे छोटे गोळे करा आणि पेढ्याचा आकार द्या.
पेढ्याच्या मध्यभागी पिस्त्याचा काप किंवा केशराची काडी लावून सजवा.
अशा प्रकारे आज आपण गुढीपाडव्यासाठी खास 'झटपट मलाई पेढा' तयार आहे.