Team Agrowon
डेंगी, चिकुनगुनिया आणि अन्य साथीच्या आजारांत कमी झालेल्या रक्तातील पेशी वाढविण्यासाठी हिरव्या किवी फळापेक्षा ‘पेरू’च जास्त उपयोगी ठरल्याचे तुलनात्मक संशोधनातून सिद्ध झाले आहे.
सुमारे १०० रुग्णांवर केलेले हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फूड ॲण्ड न्यूट्रिशनल सायन्सेस’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आहारतज्ज्ञ आणि संशोधक डॉ. स्वाती खारतोडे यांनी हा तुलनात्मक अभ्यास केला आहे.
साथीच्या आजारांमध्ये पेशी कमी झाल्यावर बरेचसे डॉक्टर्स आणि आहारतज्ज्ञ देखील किवी खाण्याचा सल्ला देतात, मात्र किवी हे फळ खूप महाग असते म्हणून सर्वांनाच परवडते असे नाही.’’
किवीपेक्षा कितीतरी जास्त पटीने ‘पेरू’ आणि ‘आवळा’ यामध्ये ‘जीवनसत्त्व क’ असते. परंतु आवळा ठरावीक काळामध्येच मिळतो म्हणून डेंगी आणि चिकुनगुनिया रुग्णांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवी आणि पेरू यांच्या प्रभावाचे तुलनात्मक संशोधन केले.
विषाणुजन्य आजारांमध्ये पेशी वाढविण्यासाठी किवीपेक्षा पेरू (पांढरा आणि गुलाबी गर असलेले दोन्ही) खाल्ल्यास पेशी लवकर वाढतात आणि रुग्ण लवकर बरे होतात.
डेंगी, चिकुनगुनियामध्ये किवी फळापेक्षा पेरू चांगले आहे, हे या संशोधनामधून सिद्ध होते, असा निष्कर्ष या संशोधनामधून निघाला आहे’’.
Donkey Milk : गाढविणीच दूध खरचं औषधी असतं का? आता होणार संशोधन