Aslam Abdul Shanedivan
पेरू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून पेरूच्या पानांमध्ये देखील औषधी गुणधर्म असतात
पेरूच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे, कॅल्शियम, प्रथिने, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी औषधी गुणधर्म आढळतात
त्यामुळे पेरूच्या पानांपासून बनवलेल्या चहापासून आपल्या आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात.
पेरूच्या पानांमध्ये असणाऱ्या बायोएक्टिव्ह कंपाऊंडमुळे आपले वजन कमी करता येते.
पेरूच्या पानांचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असून पेरूमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरूच्या पानांचा चहा सर्वात फायदेशीर असून ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते
पेरूच्या पानांचा चहा पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. पेरूच्या पानांचा चहा प्यायल्याने पोट फुगणे थांबते आणि गॅस आणि अपचनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.