Team Agrowon
लग्नकार्यात सजावटीसाठी, बुके सजावटीसाठी शोभिवंत सुर्यफुलाला मागणी आहे.
विविध सणवारांचा अंदाज घेऊन दीड ते दोन महिने अगोदर १० ते १५ दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन करावे. जेणेकरून फुले काढणीस टप्प्याटप्प्यात करता येईल.
वर्षातून साधारण १० ते १२ वेळा लागवडीचे नियोजन कऱता येते. एक गुंठे क्षेत्रावर लागवडीसाठी साधारण १ हजार बिया आवश्यक असतात.
शोभिवंत सुर्यफुलाच्या एका झाडाला एकच फूल येते. साधारणपने ४५ ते ५५ दिवसात फुले काढणीस तयार होतात.
एका फुलाला सरासरी १० ते २५ रुपये दर मिळतो. बाजारात शोभिवंत सूर्यफुलाची जास्त आवक झाल्यास दर १० रुपये प्रति फूल इतका कमी होतो. त्यासाठी बाजारातील मागणी आणि दरांचा अंदाज घेऊन विक्रीसाठी बाजारपेठेची निवड करावी.
वेळेवर तोडणी केल्यास फुले जास्त काळ टिकतात. क्लारीन च्या पाण्यात फुले ठेवल्यास फुले १० ते १४ दिवस टिकतात.
फुलांच्या पाकळ्यांच्या संरक्षणासाठी दांड्यावर फुलाच्या बाजूने प्लॅस्टिकचे वेस्टण लावावे. योग्यप्रकारे पॅकिंग केल्यामुळे फुलांचा दर्जा उत्तम राहून विक्रीवेळी चांगले दर मिळतात.