Biodynamic Composting: बायोडायनॅमिक कंपोस्टिंग: कमी खर्चात तयार करा उत्तम सेंद्रिय खत

Swarali Pawar

कमी खर्चात सेंद्रिय खत हवंय?

रासायनिक खतांच्या वाढत्या खर्चात सेंद्रिय पर्याय महत्त्वाचा ठरतो. बायोडायनॅमिक कंपोस्टिंग ही सोपी आणि प्रभावी पद्धत आहे.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

बायोडायनॅमिक कंपोस्ट म्हणजे काय?

ही कंपोस्ट तयार करण्याची नैसर्गिक आणि कमी खर्चाची पद्धत आहे. यामुळे जमिनीत पोषक घटकांचे संतुलन राखले जाते.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

याचे फायदे काय?

२ ते २.५ महिन्यांत चांगले कंपोस्ट तयार होते. यामुळे मातीचा पोत सुधारतो आणि उत्पादन वाढते.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

पोषक तत्वांनी भरपूर

या कंपोस्टमधून नत्र, स्फुरद आणि पालाश मिळते. तसेच झिंक, लोह, मॅग्नेशियमसारखी सूक्ष्म अन्नद्रव्ये मिळतात.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

कोणते साहित्य लागते?

पिकांचे अवशेष, हिरवा पाला आणि शेण यांचा वापर होतो. S-9 कल्चर वापरल्याने कुजण्याची प्रक्रिया जलद होते.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

तयार करण्याची पद्धत

अवशेषांचे थर करून त्यावर शेणकाला शिंपडावा. अशा थरांमध्ये ढिग तयार करून शेवटी लिंपून घ्यावा.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

मधली प्रक्रिया महत्त्वाची

एक महिन्यानंतर ढिग उलथून पुन्हा आकार द्यावा. पाणी टाकून पुन्हा लिंपल्यास कंपोस्ट चांगले तयार होते.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

वापर आणि फायदा

हे कंपोस्ट ओल असताना शेतात वापरावे. यामुळे माती सुपीक होऊन उत्पादनात वाढ होते.

Biodynamic Composting At Farm | Agrowon

Mango Buying Tips: आंबा घेताना फसू नका! योग्य आंबा ओळखण्याच्या स्मार्ट टिप्स

अधिक माहितीसाठी..