Sainath Jadhav
ग्रीन टी आणि जिऱ्याचे पाणी दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहेत, पण कोणते तुमच्यासाठी योग्य आहे?
ग्रीन टीत अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करतात.
ग्रीन टी त्वचेची जळजळ कमी करते, मुरुमांवर नियंत्रण ठेवते आणि तेलकटपणा कमी करून त्वचा स्वच्छ ठेवते.
जिऱ्याचे पाणी शरीर डिटॉक्स करते, रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेला आतून पोषण देऊन चमक वाढवते.
जिऱ्याचे पाणी पचन सुधारते, ज्यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि डाग कमी होतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवते.
त्वचेवर मुरुम आणि जळजळ असेल तर ग्रीन टी चांगली. डिटॉक्स आणि हायड्रेशनसाठी जिऱ्याचे पाणी उत्तम आहे.
सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्या आणि दुपारी किंवा संध्याकाळी ग्रीन टी घ्या. दोन्ही एकत्र टाळा.
ग्रीन टी त्वचेला सूर्यापासून संरक्षण करते, तर जिऱ्याचे पाणी त्वचेचे डाग कमी करते, ज्यामुळे चमक टिकते.
जास्त ग्रीन टी किंवा जिऱ्याचे पाणी पिऊ नका, कारण यामुळे पोटदुखी होऊ शकते. दररोज १-२ कप पुरेसे आहेत.