Mahesh Gaikwad
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात असंतुलित आहार आणि चुकीच्या सवयींमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात.
चांगल्या फिटनेस आणि निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक असते.
ग्रीन टी पिण्याचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. यात अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्वे मुबलक असतात.
ग्रीन टी हे एक आरोग्यवर्धक पेय आहे, जे आरोग्यासाठी विविध प्रकारे लाभदायक मानले जाते.
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचा घटक असतो, जे शरीराचे मेटॅबॉलिझम वाढवते आणि चरबी कमी करण्यास मदत करते.
ग्रीन टीमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
ग्रीन टीमध्ये असलेले कॅफिन आणि एल-थेनिन मेंदूला जागृत ठेवते आणि तणावही कमी करते.
ग्रीन टी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. परिणामी त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी होते. ही माहिती सामान्य माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.